प्रभाकर नानावटी - लेख सूची

नास्तिकवादः एक अल्प परिचय

अगदी लहानपणापासूनच आपल्यावर संस्काराच्या नावाखाली देव-धर्म यांची शिकवण दिली जाते. पालकांना जरी देव-धर्माचे अवडंबर पसंद नसले तरी समाजात वावरताना त्यांच्या मुलां/मुलींची कळत-नकळत देव-धर्माची, पुसटशी का होईना ओळख होते. सण-उत्सव साजरा करत असताना देव-धर्माच्या उदात्तीकरणाला पर्याय नसतो. कुठल्याही गावातील वा शहरातील गल्लीबोळात एक फेरी मारली तरी कुठे ना कुठे देऊळ दिसते. या देवळाच्या गाभाऱ्यातील देवाच्या/देवीच्या मूर्तींची …

खट्टरकाकांची भगवद्गीता

प्रो. हरीमोहन झा (१९०८ – १९८४) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील भगवद्गीता या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर देत आहे. या पुस्तकातील लेख १९५०च्या दशकात लिहिलेले असले तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत. ‘खट्टर काका’ हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु प्रो. हरीमोहन झा यांना केवळ विनोदी …

मानवी प्राण्यातील जाणीव भान (उत्तरार्ध)

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जाणीव वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यावरून तयार केलेल्या चित्रपटात, टीव्ही मालिकेत एखादा स्मार्ट रोबो कचरा गोळा करताना, शहाण्यासारखा वागताना दिसतो. तेव्हा आपण टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करतो. कदाचित प्रत्येकाच्या मनात माणूस बुद्धिमान रोबो बनवू शकतो अशी एक अतृप्त आशा घर करून बसलेली असावी. जाणिवेचा अभ्यास करताना कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आतापर्यंतच्या संशोधनाचा नक्कीच उपयोग होईल असे तज्ज्ञांना वाटते. जाणीव समजून घ्यायची असल्यास …

मानवी प्राण्यातील जाणीव भान (पूर्वार्ध)

मेंदूतील क्रिया–प्रक्रियांचे निरीक्षण जगाच्या रहाटगाडग्यात वावरत असताना प्रत्येकाला हजारो समस्यांचा सामना करावा लागतो, प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. काही प्रश्न अगदीच क्षुल्लक असतात; परंतु आपणच त्यांना मोठे समजून आपला श्रम आणि वेळ वाया घालवत असतो. काही वेळा प्रश्न गंभीर असला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे गोत्यात सापडतो. काही समस्या मात्र खरोखरच गुंतागुंतीच्या असल्यामुळे त्यांची …

मुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे –

प्रो. हरिमोहन झा (१९०८ – १९८४) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील ‘फलित ज्योतिष’ या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर ‘आजचा सुधारक’च्या वाचकांसाठी देत आहे. हा लेख १९४८ साली लिहिलेला असला तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारा आहे.खट्टर काका हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु हरिमोहन झा यांना केवळ विनोदी …

भांडवलशाही हीच एक मोठी समस्या

पृथ्वीच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालणारी भांडवलशाही – मग ती कार्पोरेट भांडवलशाही असो की ग्राहक (consumer) भांडवलशाही की क्रोनी कॅपिटॅलिझम, वा social, liberal , market economy इत्यादींपैकी कुठलीही असो – हीच एक फार मोठी समस्या आहे. भांडवलशाहीला जोडलेल्या या विशेषणांना दोष न देता मूळ नामपदाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे त्यामुळे सयुक्तिक ठरू शकेल. भांडवलशाहीतील पाठभेदांकडे बोट न दाखवता मूळ व्यवस्थाच आपल्या पृथ्वीला गिळंकृत करण्याच्या …

नास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी

नास्तिकता हा शब्दप्रयोगच आपल्यासारख्या विचार करून निर्णय घेणाऱ्यावर, न्यायोचित व नैतिक कृती करणाऱ्यावर अन्याय करणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण नास्तिक हा शब्द सामान्यपणे आस्तिक नसणाऱ्यांसाठी म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्यांसाठी वापरला जातो. परंतु नास्तिकता फक्त परमेश्वर ही संकल्पनाच नव्हे तर या संकल्पनेच्या अवतीभोवती असलेल्या एकूणएक गोष्टी नाकारत असते. परमेश्वर या संकल्पनेभोवती असलेल्या बहुतेक …

पत्रोत्तर – हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे या लेखकद्वयांचा ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊ या ’ हा प्रतिसादवजा लेख वाचत असताना डॉ. शंतनू अभ्यंकरांच्या लेखातील मुद्द्यांचा त्यांनी केलेला प्रतिवाद हा आताच्या प्रचलित राजकारणातील वितंडवादासारखा आहे की काय असे वाटू लागते. काँग्रेसने केलेल्या चुका आम्हीही (पुनःपुन्हा) केल्या तर बिघडले कुठे? याच तालावर ॲलोपॅथीतही  दोष असताना (पर्यायी) देशी औषधोपचार पद्धतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे …

अफवा आवडे सर्वांना! – प्रभाकर नानावटी

जगभरातील अफवा आणि त्यांचे बळी जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या करोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक राष्ट्र भांबावून गेलेले असताना या भीतीची तीव्रता वाढविण्यात समाजमाध्यमावरून पसरत असलेल्या अफवांना कसे अटकाव करावे हा मोठा प्रश्न सर्व संबंधितांच्या समोर उभा आहे. करोना संसर्गाला आटोक्यात आणून ठप्प झालेल्या जागतिक स्तरावरील सर्व व्यवहारांना …

लोकशाहीचा गळा आवळणारे….

सर्व सत्ता हस्तगत केल्याशिवाय राजा कधीच स्वस्थ बसणार नाही , अशी एक सरंजामशाहीच्या काळातील म्हण होती. ध्येय-धोरणे ठरवणारे कुणीतरी, कायदा पास करणारे आणखी कुणीतरी, न्याय-निवाडा करणारे भलतेच कुणीतरी, असे वेगवेगळ्या लोकांच्या हाती कारभार असल्यास निरंकुश सत्ता व सत्तेची अंमलबजावणी एकाच्याच हाती येणे फार कठिण होईल, याची कल्पना राजाला असल्यामुळे साम, दाम, दंड, भेद ही नीती …

इंटरनेटचा मतदानावर होणारा परिणाम (वा दुष्परिणाम!)

२०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एखाद्या राजकीय पक्षाने इंटरनेटचा वापर करण्याचे ठरवल्यास इंटरनेटचे परिणाम (वा दुष्परिणाम!) काय होणार आहेत किंवा होणार की नाहीत याचा विचार करताना २०१६ मधील अमेरिकेतील निवडणुकीच्या वेळी ट्रोल्सनी (जल्पकांनी) घातलेल्या धिंगाण्याकडे पाहणे गरजेचे ठरेल. डोनाल्ड ट्रम्पच्या निवडणुकीतील यशाला (वा हिलरी क्लिंटनच्या अपयशाला!) रशियाच्या मदतीने उभी केलेली इंटरनेटवरील ट्रोल्सची फौजच …

विवेकी विचारांची मुस्कटदाबी

पुरोगामी विचारांसाठी वाहिलेले दि न्यू रिपब्लिक हे अमेरिकन मासिक 1915 पासून प्रसिद्ध होत आहे. त्याच्या पहिल्या अंकात या प्रकारच्या मासिकाची समाजाला का गरज आहे याबद्दल संपादकाने या काळात आपल्याला सर्वनाशापासून वाचवण्याची, आपल्या दुःखावर फुंकर घलण्याची, आपल्याला संरक्षण देणारी शक्ती फक्त सुस्पष्ट विचारांना आहे असा उल्लेख केला होता. खरे पाहता यात अतिशयोक्ती नाही. काही जणांना स्पष्ट …

अजून एका पुरोगामी विचारवंताची हत्या

कर्नाटकातील हंपी विश्वविद्यालयाचे माजी उपकुलगुरू, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येथील त्यांच्या राहत्या घरी 30 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 8.40 वाजता 2 अज्ञात इसमांकडून गोळी घालून हत्या करण्यात आली. कुठल्याही उपचारापूर्वीच त्यांचा जीव गेला होता. मृत्यु समयी त्यांचे वय 77 वर्षाचे होते. डॉ. एम. एम. कलबुर्गी हे ख्यातनाम साहित्य संशोधक, विमर्शक व जुन्या कन्नड …

नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?

संगणक (यात संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधांचा समावेश आहे.) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही …

गूगल आपल्याला मठ्ठ तर करत नाही ना?

काही तुरळक अपवाद वगळता, एका निरीक्षणानुसार आजच्या तरुण पिढीच्या मेंदूचा बराचसा भाग ईमेल्स, ट्वीटर्स, चॅट्स, स्टेटस् अपडेट्स इत्यादींनी व्यापलेला असल्यामुळे बहुतेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभाव असतो व चित्त विचलित झालेले असते. अमेरिकेतील कॉलेजमधील 80 टक्के विद्यार्थी मॅसेजेस, फेसबुक, न्यूजफीड व इतर गोष्टी ताशी एकदा तरी, 10 टक्के ताशी सहा वेळा तरी वापरत असतात. व इतरांच्या …

भारतातील रॅशनॅलिस्ट चळवळ

एका अभ्यासू रॅशनॅलिस्टच्या मते भारत देश हा फक्त धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचाच देश नसून  नीरिश्वरवाद, विवेकवाद, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती, अज्ञेयवाद यांचेही अंश कुठे ना कुठे तरी या देशात प्राचीन काळापासून सापडतात. जेव्हा हे मत आपण धसास लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील खरेपणाविषयी संशय वाटू लागतो. कारण आपल्या आवती भोवती धर्माच्या अतिरेकामुळे विवेक, मानवता …

रॅट रेसचा विळखा!

तुम्हाला आपण फार असहाय आहोत, अगतिक आहोत असे वाटते का? कुणीही आपली दखल घेत नाही अशी भावना अधूनमधून येत असते का? या जगात आपला निभाव लागणार नाही हा विचार येत असतो का? अस्तित्वासाठीची स्पर्धा, स्पर्धेतून स्वार्थ, भीती, व इतरांचा दुस्वास इत्यादीमुळे आपण मानसिक स्वास्थ्य हरवून बसलो आहोत असे वाटत असते का? असे काही वाटून घेणारे …

फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांचे भवितव्य !

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी 4 एप्रिल 2014 रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील ‘मतसंग्रामा’च्या बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते. नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर …

मार्क्सचा शासनसंस्थाविषयक विचार या लेखातून आध्यात्मिकता

आध्यात्मिकते (spiritualism)ची खरोखरच गरज आहे का ? आजकाल ‘माझा कुठल्याही धार्मिक कर्मकांडावर विशास नाही; मी धार्मिक नाही; परंतु मला आध्यात्मिकतेची (spiritualism) रुची आहे’ असे सार्वजनिकरीत्या विधान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जणु काही आध्यात्मिकता म्हणजे एक फॅशन असल्यासारखे त्याकडे बघितले जात आहे. इंटरनॅशनल म्हणून स्वत:च शिक्का मारून घेतलेल्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तर याचे …

आधुनिक अंधश्रद्धा

प्रत्येक समाज वा संस्कृती कित्येक पिढ्यांपासून आलेल्या रूढी परंपरांचे शक्य तितके पालन करण्याच्या प्रयत्नात असतो. अशा रूढी परंपरामध्ये श्रद्धा – अंधश्रद्धांचा वाटा फार मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा त्यांच्यातील फोलपणा स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा, ‘त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना’ असे म्हणत त्या पाळल्या जातात. मांजर आडवे गेल्यास एक क्षण थांबून पुढे गेल्यामुळे अपशकुनाचा परिणाम …

आधुनिक अंधश्रद्धा ०१

विमान: विमानप्रवासात फुलाचा गुच्छ नेणे अशुभ समजले जाते. रिकाम्या आसनांचे सीट बेल्ट्स क्रॉस करून ठेवतात. तसे न ठेवल्यास भूत त्या सीटवर बसून प्रवास करते म्हणे! ग्रेलिन नावाच्या भुतामुळे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड होतो, असा समज आहे. त्यासाठी बीअरचा नैवेद्य दाखविला जातो. अॅम्ब्युलन्स : घाईगर्दीच्या वेळी अम्ब्युलन्समधून लिफ्ट घेणे अशुभ समजले जाते. वाटेत अम्ब्युलन्स दिसल्यास ती नजरेआड …

आधुनिक अंधश्रद्धा ०२

हातरुमाल : हातरुमाल खाली पडल्यास स्वतः उचलणे अशुभ समजले जाते. घडी केलेला रुमाल सतत बाळगणे संकटांना आमंत्रण देऊ शकते. एखाद्याचा/एखादीचा रुमाल उसना घेणे म्हणजे त्याचे/तिचे दु:ख/ अश्रू मागून घेणे. रुमालाला गाठ बांधून ठेवल्यास भूतबाधा होत नाही. सुईदोरा : काळा दोरा ओवलेली सुई रस्त्यावर दिसणे अशुभ समजले जाते. गर्भिणीने अशी सुई बघितल्यास तिला मुलगी होणार. दिवसाची …

मानवी अस्तित्व (१२)

आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल? मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विशाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल असे म्हणावे लागते. हे विश कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता …

मानवी अस्तित्व (११)

माणूस प्राणी नामशेष होणार का? अमरत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मृत्यूच्या बरोबरच्या झोंबाझोंबीत अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट हा लढा माणसाला गोत्यात आणत आहे. परंतु आता आपल्याला वैयक्तिक मृत्यूबद्दलचा (स्वार्थी!) विचार करायचा नसून संपूर्ण मानववंशाच्या अस्तित्वाबद्दल काळजी करायची आहे. विशिष्ट दिवशी हा मानव वंश नामशेष होणार, मानवासकट जगातील समस्त प्राणिवंश नष्ट होणार, महाप्रलय येणार, …

मानवी अस्तित्व (१०)

हुबेहूब माझ्यासारखा अजून कुणीतरी कुठेतरी असेल का? प्रचंड अंतरावरील एखाद्या दुसऱ्या दीर्घिकत आपल्यासारखीच एक आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेतसुद्धा आपल्या येथील सूर्यासारखा तारा आहे. या तारेपासून पृथ्वीसारखाच दिसणाऱ्या एका तिसऱ्या ग्रहावर तुच्यासारखाच दिसणारा अस्तित्वात आहे. तुच्यासारखाच तो जीवन जगत आहे. एवढे कशाला, तुम्ही आता जे वाचत आहात तेच तो तिथे वाचत आहे. अगदी तीच ओळसुद्धा…. आश्चर्याचा …

मानवी अस्तित्व (९)

संगणक आपला ताबा घेतील का? आपला मेंदू म्हणजे एक अजब व विचित्र रसायन आहे. जगातील इतर कुठल्याही गुंतागुंतीच्या रचनेपेक्षा मेंदूची गुंतागुंत अनाकलनीय ठरत आहे. तरीसुद्धा आपण त्याला रक्त-मांस-चेतापेशी-मज्जारज्जू पासून तयार झालेले मशीन असेच म्हणू शकतो. म्हणजेच मेंदच्या कार्यप्रणालीप्रमाणे कार्य करू शकणारे मशीन आपणही बनवू शकतो असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांध्ये …

मानवी अस्तित्व (८)

मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का? आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुरूप वागतो की आपल्याकडून कोणी हे करून घेते याबद्दल नेमके भाष्य करणे जवळजवळ अशक्य आहे. रेने देकार्त (१६४४) म्हणून एक तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याने हे जग खरोखर आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. जग आहे का म्हटल्यावर त्यातील चराचर सृष्टी आहे का असाही प्रश्न …

मानवी अस्तित्व (७)

माणसात ‘स्वत्व’ (self) असे काही असते का? आपण जेव्हा झोपतो तेव्हा ती नाहीशी होते. जागे होतो तेव्हा परत आपोआप आलेली असते. काही वेळा स्वप्नात येते. काही वेळा स्वप्नच गायब झालेले असतात. हे शरीर माझेच आहे व मीच त्याचे नियंत्रण करत आहे याची जाणीव देणारे असे काही तरी आपल्यात असावे. त्यामुळे आपण आपली वेगळी ओळख पटवून …

मानवी अस्तित्व (६)

माझ्यात जाणीव आली कुठून? आपण कालकुपीत बसून आपला जन्म होण्यापूर्वीच्या काळात जायचे ठरविल्यास आपण त्यावेळी कुठे होतो, हे सांगता येईल का? पुन्हा एकदा कालकुपीत बसून आपल्या मृत्यूनंतरच्या भविष्काळातील फेरफटका मारण्याचे ठरविल्यास आपण कुठे आहोत, हे तरी सांगता येईल का? स्पष्ट सांगायचे तर आपण कुठेही नाही. एके दिवशी आपल्या तुटपुंज्या आयुष्याची काही कारण नसताना सुरुवात होते …

मानवी अस्तित्व (५)

मी होलोग्रामसदृश प्रतिमा असेन का? आपल्या अवतीभोवती असलेल्या वस्तूंकडे नजर टाकल्यास समोरची भिंत, बसलेली खुर्ची, बाहेरचे झाड, तुम्ही स्वत: हे सर्व खरेखुरे असून त्या अस्तित्वात आहेत याबद्दल तुमच्या मनात अजिबात शंका असणार नाही. परंतु जगातील या गोष्टी, तुम्ही आम्ही सर्व, व हे जग एखाद्या होलोग्राम आकृतीप्रमाणे त्रिमितीतील प्रतिमा तर नाहीत ना? काही तरी विचित्र विधान …

मानवी अस्तित्व (४)

गितामा हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का? या प्रश्नाचे उत्तर कदाचित गोल्डिलॉक पॅराडॉक्समधून मिळू शकेल. अणूमधील परमाणूंना घट्ट धरून ठेवणारे सशक्त आण्विक बल जरूरीपेक्षा जास्त असते तर सूर्यासारख्या तळपत्या ताऱ्यातील हायड्रोजन वायू क्षणार्धात भस्मीभूत झाले असते. आपल्या माथ्यावर तळपणाऱ्या सूर्याचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होत तो तारा नष्ट झाला असता व या पृथ्वीवर एकही जीव …

मानवी अस्तित्व (३)

आपण (बुद्धिमान सजीव) या विश्वात एकटेच आहोत का? निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळी पाहत असताना आपल्याकडेही कुणीतरी पाहत असतील असा भास होण्याची शक्यता आहे. लुकलुकणारे तारे कुणाचे तरी डोळे नसतील ना असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित त्या देदीप्यमान, विस्मयकारक ठिणग्यांमधूनच – ज्याला आपण चेतना म्हणतो त्यातूनच – आपल्या अस्तित्वाला आकार मिळाला असावा. आपले अंतर्मन मात्र या …

मानवी अस्तित्व (२)

मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे? प्रसिद्ध विज्ञानकथालेखक डोग्लास एडम्स यांच्या मते या विश्वाचा आकार प्रचंड, अतिप्रचंड आहे. तरीसुद्धा महास्फोट सिद्धान्तानुसार (big bang theory) हिशोब केल्यास एके काळी हे विश्व आकाराने फारच लहान होते, असे म्हणता येईल. 1370 कोटी वर्षापूर्वी काळ व अवकाश शून्यातून बाहेर पडले, असा दावा हा सिद्धान्त करतो. हे कसे शक्य झाले? …

मानवी अस्तित्व (१)

आपण कुठून आलो? आफ्रिकेच्या दंतकथेनुसार माणसे मध्य आफ्रिकेतून आली. मानवी अस्तित्वापूर्वी येथे फक्त अंधार होता व सर्व पृथ्वी जलमय होती. बुबा नावाचा देव होता. एके दिवशी बुंबाचे पोट अचानकपणे दुखू लागले. वेदना थांबेनात. शेवटी त्याला उलट्या होऊ लागल्या. वांतीतून सूर्य बाहेर पडला. सूर्याच्या तापमानामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर झाले. त्यामुळे जमिनीचा काही भाग दिसू लागला. तरीसुद्धा …

नैतिकतेचे बदलते स्वरूप

मुळात नैतिकता कुठून येते, या प्रश्नाचे उत्तर शोधताना १८ व्या शतकातील डेव्हिड ह्यूम या स्कॉटिश तत्त्वज्ञापर्यंत आपल्याला जावे लागेल. त्याच्या मते नैतिकता वासनांची गुलामी करते (“the slave of the passions’). त्यांनी हे निष्कर्ष ‘चांगले काय व वाईट काय’ या अभ्यासाअंती काढले होते. आपण ज्याला चांगले वा वाईट असे म्हणत असतो त्याचे मूळ आपल्या मनात एखाद्या …

नैतिकतेची वैश्विकता

मार्क हॉसर हे नामवंत मानसतज्ज्ञ असून मन, मेंदू व वर्तणूक यांविषयी विशेष अभ्यास करत आहेत. त्यांच्या मॉरल माइंड्स (Moral Minds: How Nature Designed Our Universal Sense of Right and Wrong) या पुस्तकात नीतिमत्तेच्या वैश्विक स्वरूपाबद्दल विस्तृतपणे चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेल्या काही प्रश्नोत्तरांतून नैतिकतेविषयी त्यांना काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. माणसांमध्ये …

पवित्रतेची बदलती व्याख्या

प्रभाकर नानावटी नवीन संस्कृती आर्थिक व्यवहारांचे व माहिती-संवाद तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण होत असलेल्या या कालखंडात सर्वस्वी वेगळी वाटणारी संस्कृती मूळ धरू पाहत आहे. ही नवीन संस्कृती मानवी हिताची असेल किंवा नसेलही. आता अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या उलथापालथींची अनेक कारणे असू शकतील. पृथ्वीतलावरील प्रत्येकाला हवामानबदलाचा फटका बसत आहे. आपल्यातील सर्वांना पेट्रोलियम पदार्थ संपून जाण्याच्या भीतीने त्रस्त केले आहे. …

ब्रेन डेड् की हार्ट डेड् ?

मृत्यूची बदलती व्याख्या मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात क्यूबा येथे शेकडो नसतज्ज्ञ, वैज्ञानिक व तत्त्वज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्या परिषदेतील चर्चेचा मुख्य विषय होता, ‘मृत्यूची व्याख्या’. जीवन व मरण यांच्यातील सीमारेषा दिवसेंदिवस अस्पष्ट व धूसर होत असल्यामुळे आता तो गंभीर चर्चेचा विषय होऊ पाहात आहे, व ती सीमा आखणे ही एक मोठी समस्या मानली जात …

श्रद्धा धार्मिकांचा प्लॅसिबो

श्रद्धेचा रिमोट वापरून एक बारीकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटिमीटरसुद्धा पुढे सरकता येणार नाही. पण श्रद्धा असल्यास डोंगरसुद्धा चालत येऊ शकतो असी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे काही नाट्यपूर्ण घटना घडतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिण्यामुळे अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत, असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले …

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी……

गेल्या काही वर्षांत आपल्या देशातीलच नव्हे तर इतर अनेक देशांतील शिक्षणव्यवस्थेत अनेक स्थित्यंतरे झालेली आहेत. शिक्षणासाठी वाढीव आर्थिक तरतूद, शिक्षणव्यवस्थापनात व्यावसायिकता आणण्याचे प्रयत्न, अद्ययावत् ज्ञान मिळण्यासाठी पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकांची फेररचना, चाचणी व परीक्षा पद्धतीत सुधारणा, विद्यार्थी व शिक्षक यांचे मूल्यमापन, खासगी संस्थाचा वाढता सहभाग, केंद्र शासन-राज्यशासन-स्थानिक स्वराज्य संस्था यांची उदासीनता, बालवाडी ते पदव्युत्तर व्यावसायिक शिक्षणासाठी …

पुस्तक परिचय (क) जातीवर आधारित आरक्षण व मानवी विकास

एकविसाव्या शतकातील ‘उज्ज्वल भारता’ची स्वपक् पाहणारे या देशातील जातीवर आधारित विषमता व त्यातून घडत असलेला सामाजिक अन्याय ह्यांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत. एकूण जनसंख्येचा फार मोठा हिस्सा असलेल्या दलित समाज सामाजिक-आर्थिक विकास प्रक्रियेपासून वंचित राहत असल्यास आपल्या येथील लोकशाही कायमचीच कमकुवत राहील. केवळ निवडणुकीचा फार्स करून लोकशाही जिवंत ठेवता येणार नाही. प्रत्येक प्रौढाला एक मत …

(ग) जातः एका राष्ट्रात दुसरे राष्ट्रः रक्तविहीन क्रांतीसाठी कृती

‘अखंड हिंदु समाज’ हा एक भ्रम असून त्यातील जात मात्र वास्तव आहे. हीच वास्तवता बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांत प्रकर्षाने जाणवत आहे. राजकीय क्षेत्रात जातीचे प्राबल्य वाढत असून राजकीयरीत्या प्रतिनिधित्व नसलेल्या जाती समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला एकाकी पडत आहेत. ‘जात हेच राष्ट्र’ असे निःसंदिग्धपणे वक्तव्य करणारे, ‘ए नेशन विदिन नेशन’ या पुस्तकाचे लेखक, व्ही.टी.राजशेखर …

मागासवर्गीय आयोग – कालेलकर आयोग

पहिला मागासवर्गीय आयोग काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली १९५३ साली बसवण्यात आला होता. आयोगाने दोन वर्षांच्या अभ्यासानंतर १९५५ साली अहवाल केंद्राला सादर केला. मागासवर्गीय जाती म्हणून आयोगाने २३९९ जातींची नोंद केलेली होती. त्यांपैकी ८३७ जाती या ‘अति मागासवर्गीय’ (most backward) आहेत अशी नोंद केलेली होती. कालेलकर आयोगाच्या अहवालातील महत्त्वाच्या शिफारशी पुढीलप्रमाणे होत्याः १. १९६१ च्या जनगणनेमध्ये …

आरक्षण आणि गुणवत्ता (जात-आरक्षणविरोधी ‘द्रोणाचार्य’ मानसिकता)

तथाकथित ‘मेरिट’चा (बौद्धिक क्षमतेचा) बागुलबुवा मोहन हा मध्यमवर्गीय सुखवस्तु कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे पालक सुशिक्षित आहेत. शहरातील चांगल्या शाळेत तो शिकतो. त्याला घरी अभ्यासाकरिता स्वतंत्र खोली आहे. अभ्यासात त्याला आई-वडील मदत करतात. घरात रेडिओ, टीव्ही संच, पुस्तकं आहेत. अभ्यास व व्यवसायाभिमुख निवडीमुळे पालक-शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन मिळते. त्याचे बहुतेक मित्र याच पार्श्वभूमीचे आहेत. त्याला स्वतःच्या पुढील …

दलितांचा सर्वांगीण विकास

जरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण धोरणाचे आद्य जनक म्हणून सर्व ओळखत असले तरी ते स्वतः या धोरणाला जास्त महत्त्व देत नव्हते. दलित वर्गाचा सर्वांगीण विकास या धोरणातून होणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्याच्या उलट आरक्षण धोरणाची फळे चाखणारा वर्ग मात्र नोकरीत आरक्षण असावे याला फार महत्त्व देत आहे. एक मात्र खरे की दलितांच्यामध्ये …

मुलगा की मुलगी ?

‘मला मुलगाच हवा’ या हट्टापायी आपल्या देशात हजारो स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत. मुलगा हवा यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक वा आर्थिक कारणे काहीही असोत, उत्क्रांती व विज्ञान मात्र यासंदर्भात फार वेगळे चित्र उभे करत आहे. मुलीपेक्षा मुलगा त्याच्या आईला फार तापदायक ठरू शकतो. जन्माच्या वेळचे मुलाचे वजन, पुरुषजातीतील टेस्टोस्टेरॉन ग्रंथिस्रावाचा वाढता प्रभाव, वा मुलांमधील जन्मतःच असलेला व्रात्यपणा …

मायावतीच्या बहुजन समाज पक्षाचे यश ! 

उत्तरप्रदेशातील 2007 च्या विधानसभा निवडणुकीत मायावती व त्यांच्या बहुजनसमाज पक्षाला अभूतपूर्व यश मिळून त्यांच्या पक्षाच्या हाती सत्ता आली. निवडणूकपूर्व इतर कुठल्याही राजकीय पक्षांशी समझौता न करता स्वबळावर त्यांनी निवडणूक लढवली व सत्ता मिळवली. बहुजन समाज पक्ष (बसप) म्हणजे जातीचे विष बीज पेरणारा, तत्त्वशून्य, सत्तापिपासू, आंबेडकरांचे पुतळे व उद्याने यांतच गुरफटलेला, जन्मतिथी-पुण्यतिथींचे सोहळे करून राजकीय लाभ …

समूहाचे मानसशास्त्र

‘परिस्थितिजन्य’ मानसिकता ‘दुष्ट लोकच दुष्कृत्य करीत असतात’ या विधानाविषयी जगातील यच्चयावत सर्व सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संघ-संस्थांचे एकमत आहे. जगरहाटीची समज नसलेली लहान वयातील मुले-मुलींचा अपवाद वगळता इतरांना कशाही प्रकारे वागण्याची मुभा असणे, त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करणे आणि वरील प्रकारचे विधान करणे जगातील सर्व समाजामध्ये रूढ आहे. परंतु या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या व साध्या …

मानवी स्वभाव व डार्विनवाद (६)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.] …

मानवी स्वभाव व डार्विनवाद (५)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.] …

मानवी स्वभाव व डार्विनवाद (४)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.] …

मानवी स्वभाव व डार्विनवाद (३)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. सं.] वादविवादाच्या भोवऱ्यात डार्विनवाद व मानवी स्वभाव डार्विनच्या सिद्धान्ताचा नैसर्गिक निवडीचा भाग हा …

मानवी स्वभाव व डार्विनवाद (२)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.] …

मानवी स्वभाव व डार्विनवाद (१)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), या इंग्लंडमधील मुक्त विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्या होत्या. सध्या त्या जैवनीतिशास्त्र (Bioethics) या विषयाच्या युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन, येथे प्रपाठक (Reader) आहेत. त्यांचे द स्केप्टिकल फेमिनिस्ट हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना …

स्त्रीजन्माची जैविक कहाणी

पुरुषी नजरेतून सुशिक्षित स्त्री * अति-विद्येने स्त्रिया व्यभिचारी होतील. * स्त्रियांस सोडचिठ्ठी द्यावयाची असेल तरच स्त्री-शिक्षणाचे अनुमोदन करावे. * अनेक स्त्रिया करण्याची पुरुषांना आज मोकळीक आहे. आपल्या हातून कदाचित परदारागमन होते. स्त्रिया शिकल्या की त्या प्रश्न करतीलः “आम्हाला मोकळीक का नसावी?” * स्त्रियांस शिकवून आपण भाकऱ्या भाजाव्या काय? * स्त्रिया विद्वान झाल्यावर भ्रतार, आप्तपुरुष, वडील …

समूहाची बुद्धिमत्ता

कॉमनसेन्स हा व्यक्तीच्या पातळीवरसुद्धा सहसा आढळत नाही, हा नेहमीचा अनुभव असताना समूहामध्ये त्याचा शोध घेणे हास्यास्पद ठरेल असे वाटण्याची शक्यता आहे. एखादी गर्दी उपयुक्त विचाराला जन्म देऊ शकते हे कधीच अपेक्षित नाही. गर्दीतील बहुमत व अविचारीपणा अनेक वेळा एकट्यादुकट्याला तोंडघशी पाडतात. जातीपंचायतीतील निर्णयाविरुद्ध एक शब्द जरी उच्चारला तरी आयुष्यातून उठावे लागते. श्रेष्ठींचा दबाव व दहशत, …

भारतीय समाजासाठी विज्ञान

सामाजिक स्थिती सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन व त्यांचे सहकारी ड्रेझ व गझदार यांनी उत्तर प्रदेशातील परिस्थितीच्या मूल्यमापनाचा अहवाल सादर केला आहे. तेथील स्थितीचे वर्णन करताना त्यांनी काही धक्कादायक निष्कर्ष काढले आहेत. या राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी 160 आहे. (हेच प्रमाण अमेरिकेत केवळ 15 आहे.) अकाली मृत्युच्या बाबतीत या राज्याचा क्रमांक भारतात दुसरा आहे. गर्भवती …

समाजरचना–विचार

समाजरचनेचा विचार करताना तळागाळातील व्यक्तीपासून ‘उच्च’ वर्गातील व्यक्तींसकट सर्वांच्या हितासाठी नेमके काय हवे याचे भान हवे. जोडणारे बंध व्यक्ती-व्यक्तीमध्ये वा एकूण समाजामध्ये वितुष्ट आणणारे असल्यास त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. सामान्यपणे कुठलाही वाद व विशेषकरून टोकाचा राष्ट्रवाद व अशा राष्ट्रवादांच्या संकेत-संज्ञा वापरण्यावर दुराग्रह या कुठल्याही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाला हितावह ठरणाऱ्या नाहीत. भावनांचा उद्रेक होणार …

तिसऱ्या संस्कृतीचा उदय

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध इंग्रजी लेखक, वैज्ञानिक व टेक्नोक्रॅट सी. पी. स्नो यांनी रीड व्याख्यानमालेत भाषण करताना कलावंत व साहित्यिक यांना अभिप्रेत असलेली मानव्य (ह्युमॅनिटी) संस्कृती व तत्कालीन वैज्ञानिकांना अभिप्रेत असलेली विज्ञान-संस्कृती यावर भाष्य केले होते. याच व्याख्यानाच्या विषयाच्या आधारे स्नो यांनी ‘दि टू कल्चर्स’ हे पुस्तक लिहिले होते. व त्यात दोन्ही संस्कृतींविषयी अनेक मुद्दे …

डार्विन: तत्त्वज्ञ की वैज्ञानिक?

‘फिलॉसॉफर्स मॅगेझिन’ नावाच्या तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या मासिकाने अलि-कडेच एक ‘जन’ मत चाचणी घेतली. काल्पनिक अशा एका जागतिक ग्रंथालयाला आर्थिक अडचणीमुळे केवळ पाच तत्त्वज्ञांच्या पुस्तकांचा संग्रह ठेवावयाचे असून त्यासाठी कुठल्या तत्त्वज्ञांची निवड करावी याविषयी मते मागितली होती. अपेक्षे-प्रमाणे प्लेटो, कांट, अरिस्टॉटल, देकार्त, विटगिन्स्टाइन व ह्यूम यांची नावे त्यात होती. परंतु या जगद्विख्यात तत्त्वज्ञांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डार्विनचे …

मानवी हक्कासाठी . . .

अमेरिकेच्या बिल क्लिंटनला (बिल गेटस्ला!) ‘माहिती महाजाल व संगणक गुरूंचा अव्याहत पुरवठा करण्याचा विडा उचललेल्या या महाकाय लोकशाही राष्ट्रा-मध्ये अजूनही समाजाच्या एका हिश्शाला किळसवाणे जिणे जगावे लागत आहे. त्याची शासनासकट सर्वांना ना खेद, ना खंत! उलट मागासवर्गीयांना काही सवलती, तुटपुंज्या सोई-सुविधा वा काही विशेष संधी उपलब्ध करून दिल्यास आकाश कोसळल्यासारखे आकांडतांडव करण्यात, चिखलफेक करण्यात व …

वैज्ञानिक व आस्तिकता

वैज्ञानिक व आस्तिकता यांविषयी गेल्या तीन महिन्यात ‘आजचा सुधारक’मध्ये वेगवेगळी मते मांडण्यात आली. ह्याच चर्चेचा धागा पकडून काही माहिती देत आहे. अत्याधुनिक ज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या व सर्व प्रकारचे ऐहिक सुख भोगत असलेल्या अमेरिकन वैज्ञानिकांना ईश्वर व अमरत्व (life after death) यांविषयी काय वाटते याबद्दलची एक चाचणी नुकतीच घेण्यात आली. ३ एप्रिल १९९७ च्या ‘नेचर’च्या अंकात …

कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव

‘डीप ब्लू’ ह्या संगणकावरील कार्यप्रणालीत बुद्धिबळात अनेक वर्षे जगज्जेता असलेल्या कॅस्पोरोव्हला ‘बुद्धिमत्तेची झलक दिसली व ती एक विचित्र, अकार्यक्षम व लवचिकता नसलेली बुद्धिमत्ता आहे असे वाटले. (आजचा सुधारक जून ‘९६). नंदा खरे ह्यांना अपेक्षित असलेल्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेविषयी चर्चा न करता कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव (robot) या संपूर्ण दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या शाखांवरून बुद्धिमान यंत्रमानवाचा विकास होण्याची …

एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या जगात पुरुषाचे स्थान

जीवशास्त्र व आनुवंशिकताविज्ञानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा अभ्यास केला तर असे जाणवते की एकविसाव्या शतकाच्या मध्यावर एखाद्या जोडप्याला मूल हवे असेल तर मुलगीच पाहिजे असा आग्रह धरला जाईल. कुठलाही सुज्ञ मनुष्य मुलगा हवा अशी इच्छा करणार नाही. सबल पुरुष व अबला स्त्री ही संकल्पना कालबाह्य होईल. वैद्यकशास्त्राप्रमाणे जन्माला आलेला मुलगा गर्भावस्थेतूनच काही ना काही आनुवंशिक रोगांची शिकार …

एक प्रतिक्रिया- खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (७)

‘सायंटिफिक अमेरिकन’ फेब्रुवारी ९५ च्या अंकामध्ये पार्थ दासगुप्ता ह्यांच्या ‘लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण’ ह्या शोधनिबंधाविषयी माहिती आली आहे. उद्याचे जग जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे सुखी होण्यासाठी लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण ह्या घटकांचा विकासाशी संबंध आहे अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. ह्या संदर्भात लेखकाने ह्यामध्ये स्त्रियांच्या स्थानाबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या मते, स्त्रिया जेव्हा संपूर्ण आर्थिक …